उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वसंतराव काळे हे मराठी व साहित्याचे अभ्यासक होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतीदिनी हे संमेलन घेत आहोत. या संमेलनात ग्रामीण साहित्यीकांना दरवर्षी संधी दिली जाती, अशी माहिती आ.विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण , किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेबुवारी 2020 रोजी 8 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप ता. जि . उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे.   या पत्रकार परिषदेत प्राचार्य मुधकरराव गायकवाड, डॉ.हरिदास फेरे, प्रा.अंकुश नाडे, बालाजी तांबे उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा . दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलन स्थळास शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्य नगरी नाव देण्यात आले आहे . शिक्षणमहर्षी आ . वसंतराव काळे यांच्या 14 स्मृतीदिनानिमित्त संमेलन आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10. 30 वा . संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक आसाराम लोमटे , खासदार ओमराजे निबाळकर , मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण , उस्मानाबाद विधानसभेचे आमदार केलास पाटील आदिची उपस्थिती राहणार आहे . दुपारी 1 . 30 वा.  कृषी साक्षरता - काळाजी गरज   या विषयावर परिसंवाद होणार आहे . परिसंवादाचे अध्यक्ष स्थान कृषी महाविद्यालय , लातूरचे प्राचार्य डॉ . बी . एम . ठोंबरे भुषविणार आहेत. परिसंवादात  प्रा. डॉ . उध्दव आळसे , प्रगतशिल शेतकरी नवनाथ कसपटे व राजशेखर पाटील यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 3 वा. कथाकथन होणार आहे . कथाकथनचे अध्यक्षस्थान कळमनुरीचे ज्येष्ठ पथाकार शिलवंत यादये भूषविणार आहेत . यामध्ये प्रभाकर शेळके , विवेक गंगणे , नयन राजमाने आदिचा सहभाग होणार आहे . सायंकाळी 4 वा . प्रा . डॉ . वि . रा . राजेड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे . सायंकाळी 6 वा. संमेलनाध्यक्ष दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे .
प्रमुय अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे , सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ . मथू सावंत ,लातुर ग्रामिण विधान सभेचे आमदार धिरज देशमुख उपस्थित राहणार आहेत . सकाळी 8  वा . संमेलन स्थळापासून  दिडी निघणार आहे . शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ . देवानंद शिदे ग्रंथ दिंडीचे उद्घाटन  करणार आहेत . संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शन लावण्यात येणार आहे . ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वा . जिल्हा ग्रंथालय अधिकारी उस्मानाबादचे अनिल सुर्यवंशी करणार आहेत . चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.15 वा . सुप्रसिध्द कलावत मंगेश निपाणीकर करणार आहेत . सुप्रसिध्द व्यंगचित्रकार किशोर शितोळे यांचे व्यंगचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे . तसेच सौदागर बेघनाजे यांच्या पुरातन नाणी व वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे . रात्री 8  वा . शिवकुमार मोहेकर यांचा संगित दरबार तसेच वसंतोत्सव सांस्कृतिक मंचचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे . तत्पूर्वी 1 फेबु्रवारी रोजी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल , बाशी व आय . एम . ए . कर्जब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत केन्सर तपासणी शिबीर होणार आहे . रात्री 8वा . ह.भ.प . प्रा. गोविद इंगळे महाराज अहमदपूरकर यांचे किर्तन होणार आहे . तरी मराठ्याडयातील साहित्यिक , रसिक , शिक्षक , प्राध्यापक , नागरीक आदिनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे .
 
Top