तुळजापूर/प्रतिनिधी
नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंगा येथे बालाजी आमाईन्स कंपनी सोलापूरने खोताचीवाडी (ता. तुळजापूर) येथील जि.प.प्रा.शाळेस  संगणक संच भेट देण्यात आला. हा संगणक संच उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल शिंदे व शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके यांना देण्यात आला.
यावेळी पुर्व विधायक नरेंद्रजी बोरगांवकर , राम रेड्डी बालाजी, एम.ए. बिराजदार, विजयकुमार भोसले, शिवाजीराव सांजेकर, हणमंतराव हंगरगेकर, शिवाजीराव सांजेकर, आदित्य बोरगांवकर, निमंत्रक म्हणून एम.जी. जाथव सर अदि उपस्थित होते. संगणक संच घेण्यासाठी खोताचीवाडीतील नागरिक भानुदास सरडे, भरत क्षीरसागर, लक्ष्मण सरडे, पांडूरंग पवार होते. शा.व्य.समिती खोताचीवाडी व शाळेने संगणक संच दिल्यामुळे बालाजी अमाईन्सचे आभार व्यक्त केले.
 
Top