तेर /प्रतिनिधी-
धुम्रपानामुळे मानवाच्या शरीरावर विविध दुष्परिणाम होतात. त्यासाठी धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन तेर येथील ग्रमीण रूग्नालयातील डॉ.विजय विश्वकर्मा यानी केले आहे .      
1 जानेवारी "धुम्रमान विरोधी दिन" साजरा केला जातो.त्यानिमीत्त डॉ.विजय विश्वकर्मा यानी सविस्तर माहीती दिली.  धूम्रपानाची सवय असणाऱ्यांनी सिगरेट, पान, जर्दा लपवून ठेवावा. जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही हा सोपा परंतु सहाय्यक उपाय आहे .सिगारेट, आणि जर्दा लवकर मिळतील अशा ठिकाणी ठेवू नये. धूम्रपान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्यांना ओळखा किंवा त्याऐवजी  तोंडात चॉकलेट ठेवण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. जेव्हा धुम्रपानाची आठवण होईल तेव्हा  बसलेल्या अवस्थेत एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील सवय घालवण्यास मदत होते .जेव्हा धुम्रपान सेवनाची आठवण येईल तेव्हा तुमच्या मुलाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार करा व तुमच्यावर धुम्रपानामुळे होणाऱ्या रोगाचा विचार करा. जेव्हा तुम्हाला  धूम्रपान करण्याची आठवण येईल तेव्हा केव्हा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा .दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या .स्वत:साठी सकारात्मक बोला.दररोज आरामाचा तंत्राचा वापर करा त्यामध्ये  चालणे, ध्यानधारणा, संगीत हे केले तरी चालेल. याव्यतिरिक्त पोषण आहार घ्या. धूम्रपानमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.          धूम्रपान टाळल्यास तुमच्यातील कर्करोग, हृदयरोग होण्याचे धोके टळतात.  हृदयावर येणारा दाब कमी होतो .तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या अपत्यावर होणार नाही.तुम्हाला धुम्रपानामुळे होणारा खोकला नाहीसा होईल. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील. यासाठी धुम्रपान  करणा-यानी आपल्या आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी असे आवाहनही तेर येथील ग्रामीण रूग्नालयातील डाँ.विजय विश्वकर्मा यानी केले आहे.

 
Top