तुळजापूर/प्रतिनिधी-
भाजपच्या तालुकाध्यक्ष पदासाठी 13 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.तालुकाध्यक्षपदाची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि.24) होण्याची शक्यता आहे. दरम्यान तालुकाध्यक्षपदी निष्ठावंतांना संधी मिळणार का, नवे बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सराया धर्मशाळेत कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड. अनिल काळे, खंडेराव चौरे, सतीश देशमुख आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. बैठकीला गुलचंद व्यवहारे, विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले,प्रसाद पानपुडे,सागर कदम, सागर पारडे, गिरीश देवळालकर, बाळासाहेब शामराज, अनंत बुरांडे, आदेश कोळी, दत्ता राजमानेे उपस्थित होते.
तसेच भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी झेडपी अध्यक्ष नेताजी पाटील यांनी काही वेळ बैठकीत उपस्थिती लावली. तर नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, पंस उपसभापती चित्तरंजन सरडे, राजकुमार पाटील, विक्रम देशमुख, नगरसेवक सचिन पाटील, संतोष बोबडे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. सचिन अमृतराव, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, अॅड. अंजली साबळे, संतोष बोबडे, आदेश कोळी, बबन सोनवणे आदी 13 जणांनी मुलाखती दिल्या

 
Top