उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शासकीय रेखाकला परीक्षा 2019 करीता संजीवनी विद्यालय, चिलवडी ता. उ,बाद येथील  इलेमेंटरी  परीक्षेसाठी एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 6 विद्यार्थी "बी" ग्रेड व 29 विद्यार्थी "सी" ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला.
इंटरमिडीएट परीक्षेसाठी एकूण 17 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 11 विद्यार्थी "बी" ग्रेड मध्ये व 6 विद्यार्थी "सी" ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. एकूण 52 विद्यार्थी पैकी 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांच्या हस्ते व सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या हस्ते गुलाबपुष्प  देऊन सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे संस्थापक सचिव प्रा. के. वाय. जाधव सर यांनी अभिनंदन केले आहे. विद्याथ्र्यांना कलाशिक्षक बोराडे सरांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top