नगराध्यक्षांनी बोलाविली शनिवारी विशेष सभा 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने शनिवारी यावर नगराध्यक्ष यांनी विशेष सभा बोलावली आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रस्तावावर सुमारे पंचवीस नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत
उस्मानाबाद पालिकेत एकूण 39 नगरसेवक आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17,  शिवसेनेचे 11,  भाजपचे ८, काँग्रेसचे दोन तर अपक्ष म्हणून एक सदस्य असे बलाबल आहे शिवाय नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून आलेले असल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी अपुरे संख्याबळ असतानाही शिवसेनेने सुरज साळुंखे यांना रिंगणात उतरवीत उपनगराध्यक्ष पद पदरात पाडून घेतले होते. त्यांना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी मदत की केली. भाजपाला डिवचण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी यशस्वी झाली होती. मात्र आता दोन वर्षानंतर श्री पाटील हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढली आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17, भाजपाच्या सात तर एका अपक्ष सदस्यांनी उपनगराध्यक्ष साळुंके यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांच्या या प्रस्तावावर सह्या असतील तर त्यावर विशेष सभा बोलावली लागते. शुक्रवारी सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर शनिवारी २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्षांनी विशेष सभेचे आयोजन केले आहे.
 
Top