उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरात दिनांक 10,11 व 12 जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून यासाठी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु ) येथील गजानन चौगुले यांनी एक लाख रुपयांच्या सहाय्यता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबाद चे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे आणि संमेलनाच्या कार्यकारणी सदस्य राजेंद्र अत्रे यांच्याकडे सुपूर्त केला. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी चौगुले यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top