सुशिक्षित मुलींच्या मदतीने कांचन वाघमारे यांनी केली स्टाँबेरीची यशस्वी शेती
तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पंचक्रोषीत  बार्शी रस्त्यावर असणा-या  सिंदफळ येथील अतिप्राचीन मुदगुलेश्वर मंदीर परिसरात  तुळजापूर येथील एका शेतकरी महिलेने दोन सुशिक्षित मुलींच्या मदतीने  आपल्या शेतात स्टाँबेरीच्या खेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यातुन स्ट्राँबेरीचे उत्पन्न काढण्याची  यशस्वी किमया त्यांनी साधली आहे.
अशिक्षित शेतकरी महिला कांचन सुभाष  वाघमारे बाई व त्यांच्या दोन मुली अंजली व स्वाती यांनी  स्टांबरी शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दुष्काळ व आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना आशेचा किरण दाखवला आहे. अंजली ही आयटीसी संस्था सातारा येथे कार्यरत आहेत तर छोटी मुलगी स्वाती टाटा सामाजिक संस्था येथे शेतकरी आत्महत्या सह अनेक प्रोजेक्टवर काम करीत आहेत. उष्ण भागात थंड हवेच्या ठिकाणी येणारे स्टाँबेरी फळ शेतीतुन  उत्पन्न घेण्याची किमया  कांचन या शेतकरी महिलेने केली आहे.
तुळजापूर येथे स्टाँबरीची शेती करण्याची संकल्पना त्यांची मोठी मुलगी अंजली संतोष जाधव  यांना सुचली त्यांनी उष्ण भागात  स्टाँबरी शेती करण्याचा निर्णय घेवुन सातारा येथुन स्टाँबरी रोपे आणले. तुळजापूर येथील श्रीमती  कांचन सुभाष वाघमारे यांची कन्या अंजली संतोष जाधव व त्याचे पती संतोष विजय जाधव यांनी महाबळेश्वर मध्ये येणारे स्टाँबरी फळ पिक घेण्याचा संकल्पना सुचली व त्यांनी  प्रथमता पाच गुंठे  जमिन तयार केली,  त्यानंतर स्ट्राँबरी रोप लावुन अथक प्रयत्न करुन ती  जोपासासून महाबळेश्वर  सारखे स्ट्राँबरी चे फळ शेतात पिकवण्याची असाधारण किमया त्यंानी साधली.
यासाठी त्यांना ६० हजार खर्च आला असुन आता डिसेंबर पासुन दर्जदार स्टाँबरी फळे, येत असुन हे फळे एप्रील पर्यत लागणार आहेत थंडीत येणारे हे फळ आणण्यासाठी शेतकरी महिला कांचन वाघमारे (६०)  रोज स्वता शेतात कष्ट करुन शेती करतात. स्टांॅँबरी शेती यशस्वी करण्यासाठी अंजली व त्यांचे पती संतोष जाधव हे आठवड्यातुन एकदा येथे येवुन स्टाँबरी शेतीसाठी मार्गदर्शन करत होते.
 
Top