लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांनी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल एमव्हीएलए ट्रस्ट तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, "ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड 2019 " हा पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले. दि. 23 डिसेंबर 2019 रोजी मुंबई येथील मंत्रालयाजवळील यशवंतराव  चव्हाण सभागृहामध्ये मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट तर्फे शैक्षणिक,  सामाजिक, क्रक्रीडा, निसर्ग अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कारप्राप्त विजयकुमार शहा, पोलीस अधिकारी रमेश आव्हाड, ट्रस्टचे पदाधिकारी कुमार गोगावले, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य शहाजी जाधव यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री अनुसया जाधव, पत्नी सविता जाधव, उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी गुंजोटी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, संचालक दत्तात्रय गायकवाड, अशोक राठोड, तसेच प्रा. विशाल तडकलकर, स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार शहाजी जाधव यांना मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी,  स्कुलचे शिक्षक-कर्मचारी वर्ग व पालक वर्गातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top