उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 तालुक्यातील आंबेहोळ येथील शंभूमहादेव पाटील यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पदाच्या परीक्षेत शंभूमहादेव पाटील यांनी महाराष्ट्रात 98 वा क्रमांक पटकावला आहे.
पाटील सध्या विधी सहाय्यक विधी व न्याय मंत्रालय महाराष्ट्र शासन येथे कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण आंबेहोळ येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे झाले. या पदासाठी राज्यातून 190 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तरी या निवडीबद्दल आंबेहोळ या गावातून शंभूमहादेव पाटील यांचे कौतुक होत आहे.

 
Top