उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अखिल भारतीय नाट्य संमेलन आपण चांगल्या पध्दतीने पार पाडले. आजसुध्दा आपले कौतुक बाहेर केले जात आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आपण सक्षम असल्याचा विश्वास वाढला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यक्षमतेमुळे परिपुर्ण पार पाडू असा विश्वास भाजपाचे विधान परिषदेचे प्रतोद आ. सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंहजी ठाकुर यांनी उस्मानाबाद येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना‘या कार्यालयास 25 डिसेंबर‘या रात्री धावती भेट देऊन तयारीचा आढावा घेतला तसेच या निमित्ताने मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना आ.ठाकूर यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी कांही कमी पडणार नाही, या प्रकारचा दिलासा दिला. यावेळी मराठी साहित्य संमेलनाचे नितीन तावडे, रवींद्र केसकर आशिष मोदाणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, अनिल काळे, संताजी चालुक्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top