दिवसापासून दोन वेळेस पाणी पिण्यासाठी दिला जातो 3 मि. ब्रेक 
 वाशी/प्रतिनिधी-
येथील छत्रपती शिवाजी विध्यालय, वाशी या  विद्यालयात वॉटरबेलला सुरुवात झाली असून वाशी तालुक्यातील पहिली शाळा आहे व जिल्ह्यातील दुसरी शाळा आहे .इ 5 वी ते इ 10 वी च्या विद्यार्थ्यांना दिवसातून दोनदा पाणी पिण्यासाठी 3 मिनिटांचा ब्रेक दिला जातो . केरळ, ओडीसा, तेलंगाना राज्यातील शाळांच्या धर्तीवर वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात हा वॉटर बेलचा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. पाणी पिण्यासाठी नियमित वॉटर बेल दिली जाते. विद्याथ्र्यांचाही उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्याथ्र्यांनी नियमित पाणी प्यावे या दृष्टीकोनातून शालेय तासिकाव्यातिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल दिली जाते. विद्याथ्र्यांना 3 मिनिटांची विश्रांती दिली जाते .या दरम्यान सर्व विद्यार्थी आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून एकाच वेळी पाणी पितात असा उपक्रम राबवणारी वाशी तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालय हि पहिली शाळा आहे व जिल्ह्यातील दुसरी शाळा आहे .या बाबत मुख्याध्यापक श्री.कोकाटे दत्तात्रय म्हणाले ,बहुतांश विद्यार्थी नियमित पाणीच पीत नाहीत हि समस्या आमच्या लक्षात आलेली आहे .शाळेत 900 विद्यार्थी असून  सर्व विद्यार्थी नियमितपणे पाण्याची बाटली आणतात व वॉटर बेलच्या वेळी पाणी पितात.
विद्यालयाचे पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांनी या उपक्रमाची माहिती व संकल्पना मांडली विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून केरळ,ओडीसा,तेलंगाना मधील शाळेत दिवसातून तीन वेळेस वॉटर बेल वाजते .पाणी कमी पिल्याने डीहायड्रेशन ,थकवा येणे ,चिडचिड किंवा मुत्र मार्गात संसर्ग होण्या इतपत समस्या निर्माण होऊ शकतात. खरे तर दिवसातून तीन लिटर पाणी प्यायला हवे म्हणून पाणी म्हणजे जीवन आहे .मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने दररोज पाणी आवश्यक आहे , त्यांच्यासाठी जलघंटेची गरज आहे. तरी या उपक्रमामध्ये विद्यालयातील शिक्षक एस.एस.धारकर,एस.बी.छबिले,एस.टी कोळी ,श्रीमती एस.बी बावकर शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
 या वॉटर बेलचे स्वागत श्री.दादासाहेब चेडे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समती ),श्री.प्रताप कवडे (उपाध्यक्ष ,शिक्षक पालक संघ ), विशाल महामुनी ,गौतम गायकवाड ,पी.ए कांबळे ,पालक शिक्षण प्रेमी ,गावातील नागरिक ,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी स्वागत केले .

 
Top