उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कर्नाटक गज केशरी धोर तपस्वी प.पू. गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या तसेच प.पू. नवकार आराधिका प्रतिभाकंवर व प.पू.प्रफुल्लजी महाराज यांच्या सुशिष्या तपस्वीरत्न दक्षिताजी महाराज, लोगरस साधिका डॉ. उदिताजी महाराज तसेच नवदिक्षित महिमाजी महाराज या तीन साध्वींजींचे उस्मानाबाद शहरात आगमन झाले असून, सध्या त्यांचा मुक्काम मारवाडी गल्लीतील जैन स्थानक येथे आहे.
नववर्षानिमित्त 1 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता त्या धर्मप्रेमी बंधु भगिनींना शुभेच्छापर मांगलिक देणार आहेत. धर्मप्रेमी मंडळींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानकवासी जैन समाजाचे अध्यक्ष महावीर कोठारी तसेच अॅड. शांतीलाल कोचेटा, कांतीलाल कोचेटा, तेजराज मुथा, मनोज कोचेटा यांनी केले आहे. या तीनही साध्वीजी बार्शी येथून उस्मानाबाद येथे आल्या आहेत.येथील वास्तव्यानंतर त्या हैद्राबादकडे प्रयाण करतील. भगवान महावीरांचा संदेश देत तसेच जैन धर्माचा प्रचार व प्रसार करीत या साध्वीचा अखंड प्रवास सुरू आहे.

 
Top