उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपावाशी झालेले आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाचे अभय बाबुराव इंगळे यांनी शिवसैनेचे सचिन भारत पवार यांचा १७ विरूध्द २३ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले. विशेष म्हणजे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीची सत्ता असल्यामुळे उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी एका वरिष्ठ नेत्याने नगराध्यक्षाकडे मागणी केली होती. परंतू नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीने आम्हाला सांगू नये, शिवसेनेच्या आमच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पद द्या, असे सांगितले तरच आम्ही पद सोडू असे सांगितले होते.
उस्मानाबाद नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पार पडली. न.प.मध्ये शिवसेना ११, राणापाटील गट १६,सहयोगी सदस्य १, भाजप ०७, राष्ट्रवादी २, कॉंग्रेस २ या प्रमाणे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबालकर यांच्या अध्यक्षतेखाली पिठासन अधिकारी म्हणून बैठक झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी राणा पाटील गटाचे गणेश खोचरे, अभय इंगळे व शिवसेनेचे सचिन पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यानंतर गणेश खोचरे यंानी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. अभय इंगळे व शिवसेनेचे सचिन पवार यांच्यात उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान होऊन सचिन पवार यांना १७ तर अभय इंगळे यांना २३ मते मिळाली. पिठासन अधिकारी मकरंदराजे निंबाळकर यंानी अभय इंगळे यांना विजयी घोषीत केले.
शिवसेनेचे सचिन पवार यांच्या पारडयात कॉंग्रेस, राष्ट्रवादी सहीत एका भाजपा सदस्यांने मतदान व नगराध्यक्षांनी ही त्यांच्या बाजूने मतदान केल्याने १७ मत मिळाले. तर अभय इंगळे यांना भाजपाचे ७, राणा पाटील गटाचे १५ व सहकारी पक्ष १ या प्रमाणे २३ मतांचा आकडा गाठता आला.