उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बार्शी तालुक्यातील डॉक्टर नवनाथ मल्हारी कस्पटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिद्ध होत असलेल्या एनएमके १ गोल्डन या सिताफळ वाणास पीक संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वय स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे.त्याचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतक-यांची बोगस वाणाद्वारे होणारी फसवणूक आता थांबणार आह.े या वाणाची किंवा त्याचे नाव बदलून रोपांची विक्री करणा-या देशातील रोपवाटिकावर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती डॉक्टर नवनाथ कसपटे यांनी दिली.
शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवीण कस्पटे , एड. विक्रम सावळे, उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर कस्पटे म्हणाले, त्यांना स्वामित्व हक्क प्रमाणपत्र शेतकरी हक्क अधिक प्राधिकरणाकडून २2 नोव्हेंबर रोजी मिळाली आहे . एन एम के १ गोल्डन सिताफळ वाणाची संपूर्ण मालकी डॉक्टर कस्पटे यांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय या वाणाच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहिरात वितरण, आयात व निर्यात कोणालाही करता येणार नाही विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या वाणाचे नाव बदलून उदाहरणात गोल्डन, सुपर गोल्डन, गोल्डन बळीराजा, गोल्डन लातूर, गोल्डन रोपांची निर्मिती व विक्री करणा-या रोपवाटिका मधील रोपांची निर्मिती व विक्री बंदी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते स्वतंत्रपणे दिवाणी व फौजदारी दाखल करणार आहेत. सिताफळाच्या या वाणाची लागवड केल्यास एकरी 340 झाडापासून वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यांच्याकडे आज घडीला सीताफळाच्या विविध ३२ जाती असून अडीच हजार नव्या वाणाबाबतही संशोधन सुरू असून ते लवकरच शेतक-यांसाठी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

 
Top