उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे विधानपरिषदेत केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यासह इतर तालुक्यांचे औरंगाबाद पासून अंतर 350 किमी पेक्षा अधिक आहे. भौगोलिक दृष्ट्या अधिक दूर अंतरामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालये व युवकांची मोठी गैरसोय होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या 74 पेक्षा अधिक असून 52 महाविद्यालये असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ आहे.
उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या राज्यातील चार अतिमागास जिल्ह्यांमध्ये समावेश होतो. उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रास विद्यापीठाचा स्वतंत्र दर्जा मिळून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास अतिमागास असा मागासलेपणाचा असलेला ठपका पुसला जाउन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत होईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राने औद्यौगिक वसाहतीमधील 60 एकर जमीन खरेदी केलेली असून उस्मानाबद येथील विद्यापीठ उपकेंद्र परिसरात स्वतंत्र विद्यापीठाला साजेशी अशी सुसज्ज इमारत असून विविध विभागांच्या स्वतंत्र इमारती व इतर आवश्यक बाबी परिपूर्ण आहेत. अशी मांडणी करून उस्मानाबद येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विधानपरिषदेत केली.

 
Top