स्पर्धेत 1680 स्पर्धकांचा सहभाग, 274 विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकाचे वितरण 
तुळजापूर /प्रतिनिधी-
 तालुक्यातील यमगरवाडी ( मंगरूळ ) येथील एकलव्य विद्या संकुलच्या मैदानावर बीटस्तरीय विशेष उपक्रम विज्ञान अंतर्गत विद्यार्थी क्रक्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील 274  विजेत्या स्पर्धकांना  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंत कुंभार,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे,सहा. आयुक्त समाज कल्याण शिवकांत चिकुरते, शिक्षणाधिकारी सौ.सविता भोसले, शिक्षणाधिकारी गजानन सुसर,एकलव्य संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर,विजय वाघमारे,गणेश जळके,दूरदर्शनचे पत्रकार प्रतिनिधी देविदास पाठक, शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख विठ्ठल गायकवाड, संजय वाले आदींची उपस्थिती होती.मंगरुळ बीट अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रक्रीडा स्पर्धेसाठी  1680 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता,विविध 11 खेळप्रकारात  खेळविण्यात आलेल्या स्पर्धेमधील 274 विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मित्र सदाशिव शिंदे अनील घुगे जब्बार शेख अण्णा कोल्हटकर कांता राऊत गोळ शिक्षकांनी परिश्रम घेतले. मंगरुळ बीट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 250 शिक्षकांच्या वतीने उपक्रमशील बीट व बिटची सर्वोत्तम कामगिरी करणारे सेनापती म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांचा जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

 
Top