उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्वराज्य शिक्षक संघाचा आश्रमशाळा बांधवांचा जिल्हा मेळावा आज दि 21 रोजी सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष फत्तेसिंह पवार हे होते .या   कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नितीन बप्पा शेरखाने , हरिभाऊ बनसोडे ( कास्ट्राईब संघटनेचे प्रमुख), तर विशेष उपस्थित दादा कांबळे ( मनसे जिल्हा सचिव ), रवी वाघमारे (नगरसेवक), लक्ष्मण माने (ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष), राजकुमार मेंढेकर ( राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष)  हे होते.
सदरील मेळाव्यात जिल्ह्यातील कर्मचारी बांधवांच्या हिताचे असणाऱ्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली जसे की सातवा वेतन आयोग अमलबजाणी, वाहन भत्त्याचा फरक, जी पी एफ प्रकरणे ,वैद्यकीय बिले ,वरिष्ठ वेतन श्रेणी ,अधीक्षकांचे प्रश्न, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व डीसीपीएस धारक बांधवांचे प्रश्न, उच्चमाध्यमिक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात उभारण्यात येणा-या लढ्याविषयी चर्चा असे एक ना अनेक प्रश्नावर सकारात्मक दृष्टीने चर्चा करण्यात आली .सर्व प्रश्नांना सन्माननीय प्रदेशाध्यक्ष  फत्तेसिंह पवार यांनी आपल्या  सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच यावेळी नितीन बप्पा शेरखाने, हरिभाऊ बनसोडे, लक्ष्मण माने, राजकुमार मेंढेकर,दशरथ गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून आश्रम शाळेतील शेकडो शिक्षक बांधव , मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव उपस्थित होते. यासाठी उमरग्याचे तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे सर , भूमचे तालुकाध्यक्ष विकास शिंदे, सर उस्मानाबादचे तालुकाध्यक्ष औदुंबर जगताप यांनी सहकार्य केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष  के. के. कंटेकुरे, जिल्हा सचिव सतीश कुंभार सर ,जिल्हा संघटक पुरुषोत्तम माने ,जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग जाधव ,प्रदीप शिंदे, जिल्हा समन्वयक वसंत आवटे, शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाध्यक्ष प्रवीण केसकर उमरगा तालुका अध्यक्ष किसन देडे यांनी परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमाचे संचलन व्ही टी राठोड, प्रास्ताविक राज्य कार्य.सदस्य भालचंद्र जाधव सर, तर आभार प्रदेश संघटक बबनराव वाघमारे सर यांनी मानले.या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश संघटक बबनराव वाघमारे सर, राज्य  कार्यकारणी सदस्य भालचंद्र जाधव सर यांनी केले.
 
Top