तुळजापूर तालुकाध्यक्ष नागरसे तर उपाध्यक्षपदी मोकाशे व बिराजदार यांची निवड 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
गुरव समाजाचे आराध्य दैवत परमपुज्य संत शिरोमणी काशीबा महाराज यांचाा सोलापूर जिल्हयातील आरण येथे पुण्यतिथी सोहळा पार पडला. यावे
ळी गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, नवल शेवळे, रंगनाथ गुरव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील गुरव समाज संघठनात्मक निवडी करण्यात आल्या.
गुरव समाजाचे संत काशीबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर जिल्हयातील व माढा तालुक्यातील आरण येथे मोठया प्रमाणात गुरव समाज एकत्र आला होता. यावेळी काशिबा महाराज यांना अभिवादन करून समाजाच्या संघटनात्मक निवडी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे व सचिन धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तुळजापूर तालुकाध्यक्षपदी रोहित नागरसे, तालुका उपाध्यक्षपदी गजानन मोकाशे व पांडूरंग बिराजदार , तालुका कार्याध्यक्ष पदी ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी बापू देवडे, विलास पाटील, प्रदिप महिसागर, सचिन धारूरकर, जितेंद्र पाटील, हनुमंत गुरव, सचिन गुरव व गुरव समाजातील मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. 
 
Top