उस्मानाबाद/प्रतिनिधी-
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती साजरी करणे व नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी उस्मानाबाद येथे नुकतीच हॉटेल रोमा पॅलेस फंक्शन हॉल येथे बैठक पार पडली. यावेळी अॅड. योगेश सोन्ने-पाटील यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
 यावेळी समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, दत्ता बंडगर,भारत कोकाटे, जयंत पाटील, मसूद शेख, देवेंद्र कदम, बाळासाहेब शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, बाबा मुजावर, खलील सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवरायांच्या विचारानुसार सर्वांना सोबत घेऊन, आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत इतिहास संशोधन परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखाध्यक्षपदी निवडीबद्दल जयराज खोचरे यांचा तसेच मागील वर्षी यशस्वी शिवजन्मोत्सव साजरा केल्याबद्दल प्रणिलसिंह रणखांब व त्यांच्या सहका-यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र कोकाटे यांनी तर आभार मनोज डोलारे यांनी मानले. यावेळी आजी-माजी पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

 
Top