उमरगा/प्रतिनिधी-
 शहरातील जुन्या वस्ती भागासह, हद्दवाढ भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.शहरातील एकोंडीरोड लगत श्री महात्मा बसवेश्वर शाळेजवळ असलेल्या वात्सल्य बालगृहाच्या विद्युत मोटारीच्या खोलीत शुक्रवारी (दि. 27) सकाळी कोब्रा जातीचा नाग आढळून आल्याने एकच धांदल उडाली होती.
यावेळी शेवटी भूमिपुत्र वाघ यांनी सर्पमित्र संदिप चौगुले यांना संपर्क करून बोलावून घेतले. सर्पमित्र ज्योतिर्लिंग सोनकवडे, सुरेश कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मोठ्या शिताफीने कोब्रा जातीच्या सापास जिवंत पकडून शहरातील स्मशानभूमीच्या परिसरात असलेल्या जंगलात सोडून देवुन त्यास जीवनदान दिले.

 
Top