उमरगा/प्रतिनिधी-
 तालुक्यातील  भगतवाडी येथील श्री भगवती (जगदंबा) देवी मंदिराची यात्रा गुरूवारी (दि 26) पासून मोठया उत्साहात यात्रेला सुरुवात झाली. सूर्यग्रहणामुळे दुपारनंतर श्रीभगवती देवीच्या दर्शनासाठी पायथ्यापासून डोंगरमाथ्यापर्यंत भक्त भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी (दि27) यात्रेची मोठया भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्हयातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवतीदेवीचा यात्रा महोत्सव दरवर्षी संपन्न होतो. तुळजापूरच्या तुळजाभवानीची धाकटी बहिण म्हणून श्री भगवती देवस्थानचे महत्व आहे. मार्गशिर्ष महिन्यातील वेळ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्री देवी यात्रा महोत्सव सुरुवात होण्याची परंपरा आहे. श्री महोत्सवानिमित्त बुधवारी (25)रात्री आराध्यांचा जागर अन मेळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यंदाच्या खग्रास सूर्यग्रहणाने दुपारी ग्रहण सुटल्यानंतर मंदिराचे पुजारी सुधाकर मेकाले, भगवतीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्यासह पुजा-यांच्या हस्ते भगवती देवीला विधिवत महाअभिषेक घालण्यात आला. दिवसभर मोठ्या प्रमाणात डोंगर पायथ्याशी भव्ययात्रा भरली होती यात्रेत अनेक व्यावसायिकांची दुकाने थाटली होती, बालगोपाळांनी यात्रेत विविध खेळणीचा अन दर्शनाचा आनंद लुटला. कोंबड्यासह पुरणपोळीच्या नैवेद्याचा मान भगवती देवीच्या चरणी अर्पण करून भक्त भाविकांनी मनोकामना पूर्ण करण्याची आशा बाळगली. राज्य व परराज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांनी भगवती देवीचे दर्शन घेतले. दिवसभर यात्रेत भक्त भाविकांची गर्दी मोठी असल्याने पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गुरूवारी रात्री छबीना मिरवणूक झाल्यानंतर यात्रेची सांगता शुक्रवारी (27) करण्यात आली.
 भगवतीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष शेषेराव पवार, सचिव बी के पवार, गोविंदराव पवार, माणिक पवार, सरंपच बालिका करनूरे, उपसरपंच शिवाजी पवार, पोलिस पाटील रमेश करनुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव पवार, पोलिस पाटील बाळू स्वामी, राजकुमार करनूरे, अरविंद जाधव, श्रीमंतराव पवार, अर्जुन पवार, सिद्धेश्वर माने, विठ्ठल पवार, अतुल जाधव, शैलेश नागणे, आण्णा पवार, सिद्धेश्वर पवार यांच्यासह भगवती देवी मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी महोत्सव यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.
 
Top