उमरगा /प्रतिनिधी-
 नाशिक येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय योगमुंडो स्पर्धेत येथील समृद्धी पवार हिने सुवर्णपदकावर नाव कोरले. यामुळे तिची कोरिया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय योगमुंडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शहरातील डॉ. के. डी. शेंडगे विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी पवार हिने नाशिकला 24, 25 व 26 डिसेंबरला झालेल्या राष्ट्रीय योगमुंडो स्पर्धेत सोलापूर, धुळे व तेलंगणा येथील खेळाडूंवर मात करत सुवर्णपदक पटकावले. समृद्धी हिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्ण पटकावले होते. तसेच बीड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले होते. विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यामुळे समृद्धी हिची शिवछत्रपती क्रक्रीडा संकुल पुणे येथे राष्ट्रीय योगमुंडो ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली होती. शिवाय आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परीक्षेत येथील श्रेया व्हंडरे, सुहानी घोडके, सई राठोड, सरफराज लदाफ, लक्ष्मण काळे यांनी यश संपादन केले होते. यशस्वी विद्याथ्र्यांना प्रशिक्षक प्रताप राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 
Top