
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरीसरची विद्यार्थीनी निकीता चक्रधर पवार हिची भारतीय राष्ट्रीय खो-खो संघात निवड झाली आहे. काठमांडू येथे झालेल्या 13 व्या दक्षिण अशियाई स्पर्धेत तीने सहभाग घेतला.
विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरातील व्यवस्थापनशास्त्र विभागात निकीता चक्रधर पवार ही एमसीए द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. डॉ.चंद्रजित जाधव व संचालक डॉ.सुयोग अमृतराव यांच्या मार्गदर्शनाखाली खोखो खेळात तीने प्राविण्य मिळविले आहे. काठमांडू (नेपाळ) येथे 1 ते 10 डिसेंबर दरम्यान 13वी दक्षिण अशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये निकीताने भारतीय संघाकडून सहभाग नोंदविला. श्रीलंका, बांगलादेश व नेपाळ या देशविरोधातील संघात तीचा सहभाग होता. लासना (जि.उस्मानाबाद) येथील मुख्याध्यापक चक्रधर पवार यांची निकीता ही कन्या आहे. या यशाबद्दल निकीताचे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, मा.कुलसचिव डॉ.साधना पांडे, प्रभारी संचालक डॉ प्रशांत दीक्षित यांनी कौतुक केले आहे. विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव, प्रा वरुण कळसे, डॉ शिंदे यांनी सत्कार केला.