उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या पंचायत समिती सभापतीच्या निवडीमध्ये शिवसेनेचे आपले वर्चस्व निर्माण केले असून जिल्हयात शिवसेनेचे ४, भाजपाचे २, कॉंग्रेसचे २ जागेवर झाले पंचायत समिती सभापती झाले आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांही ठिकाणी पं.स.सदस्य फुटल्याने भाजप-सेनेचे सभापती होण्यास मदत झाली.
उस्मानाबाद पंचायत समिती मध्ये एकुण २४ पं.स.सदस्य होते. राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपामधून विधानसभा निवडणुक जिंकल्याने राणा गटाचे सदस्य भाजपावाशी झाले. उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये मुल भाजपाच्या हेमा महेश चांदणे या सभापती पदी तर उपसभापती पदी मुळ राष्ट्रवादीचे पण राणागटामुळे भाजपामध्ये गेलेले संजय लोखडे यांची उपसभापती पदी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य असलेले विराट शाहुराज पाटील हे तटस्थ राहिले. चांदणे व लोखंडे यांना १८ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेले कुसुम इंगळे  व संग्राम देशमुख (शवसेना ) यांना ५ मते मिळाली.
तुळजापूर पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना भाजपा ने पाठिंबा दिल्याने भाजपाच्या मदतीने सौ.विमलबाई मुळे सभापती व उपसभापती पदी चित्तरंजन सरडे यांची निवड झाली. तर भूम मध्ये शिवसेनेच्या मैनाबाई भडके सभापती व बालाजी गुंजाळ उपसभापती पदी यांची निवड झाली.या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर परंडयात राष्ट्रवादीमधील बंडखोरांना शिवसेने पाठिंबा देऊन सभापती पदी अनुजा दैन व उपसभापती पदी शिवसेनेच्या शितल वाघमारे यांची निवड झाली.वाशी पंचायत समिती मध्ये शिवसेनेच्या रूपाली बाबासाहेब घोलप या सभपाती व उपसभापती पदी बालाजी जगताप झाले.  तर कळंब पंचायत समितीमध्ये सभापती पदी संगीता वाघे तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे गुणवंत पवार यांची निवड झाली. कळंब पंचायत समिती सभापती निवडणुकीवरून सध्या खा.ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्ता संघर्ष पेटला आहे.
लोहारा व उमरगा पंचायत समितीमध्ये कॉंग्रसने अपले अस्तित्व टिकवले. लोहारा पं.स.सभापती पदी कॉंगे्रसच्या हेमलता रणखांब तर उमरगा पं.स.सभापदी कॉंग्रेसचे सचिन पाटील तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या फातेमा जाफरी यांची निवड झाली.
 
Top