उमरगा/प्रतिनिधी-
 मानवी जीवनात दानाचे अनेक प्रकार असून कोणतेही दान हे सर्वश्रेष्ठ असून त्यात एकाद्या व्यक्तीस रक्तदान करून त्यास जीवनदान देणे हे सर्वोत्तम दान आहे. जयंती अन स्मृतिदिनाचा अनावश्यक खर्च टाळून केलेले रक्तदान हे  कौतुका स्पद कार्य असून युवकांनी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त डिजे लावून झिंगाट करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम घेवून समाजहित जोपासावे, असे आवाहन डॉ विजयकुमार बेडदुर्गे यांनी केले.
शहरातील डॉ के डी शेंडगे रुग्णालयात कै डॉ के डी शेंडगे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (27) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ बेडदुर्गे बोलत होते. कै. डॉ. शेंडगे यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत रुग्ण व जनसेवा केली. सामाजिक बांधिलकीची जाणिवेतून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवून समाजाची व लोकांची सेवा केली. त्यांनी केलेल्या कार्याचा वसा डॉ. सचिन शेंडगे जोपासत असल्याचे गुंजोटी येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ दामोदर पतंगे यांनी सांगितले. यावेळी डॉ. आर डी शेंडगे, डॉ. सचिन शेंडगे, डॉ. सुहासिनी शेंडगे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. सारिका बेडदुर्गे, डॉ. प्रतीक जोशी, डॉ. सागर पतंगे, प्रा. अशोक दुधभाते, प्रा. गोरख घोडके उपस्थित होते.
 पुढे बोलताना डॉ दामोदर पतंगे रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदान ही लोकचळवळ व्हावी अन ऐच्छिक रक्तदाते संघटित होऊन कार्य केल्यास ही चळवळ अधिक बळकट व गतिमान होईल असे मत व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या शिबिरात 51 रक्तदात्या नी ऐच्छिक रक्तदान केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवाजी बिराजदार, प्रदीप शिंदे, माणिक दुधभाते, दत्तू दुधभाते, अविनाश सूर्यवंशी, एम डी खमीतकर, श्रीमती चंचला जाधव, गंगाधर हंचाटे, बाळू पवार, सुशांत सावंत यांच्यासह कर्मचा-यांनी परिश्रम घेतले

 
Top