परंडा /प्रतिनिधी- नगर परिषद प्रभाग क्रमांक 7 मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते इरफान शेख यांच्या पत्नी रेश्मा शेख यांनी 462 मतांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेच्या उमेदवार कणीसफातेमा मुजावर यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी परत एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रभाग क्रमांक 7 (ब) मधीन नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इरफान शेख यांच्या मातोश्री जुलेखा शेख यांचे काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाआघाडीचा धर्म पाळत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेश्मा शेख यांना पाठिंबा दिला होता.भाजपाने या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत झाली. राष्ट्रवादीचे नगराध्यंक्ष जाकीर सौदागर यांच्या दृष्टीने ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.अखेर राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले. राष्ट्रवादीच्या रेश्मा शेख यांना 1047 मते मिळाली. शिवसेनेच्या कणीसफातेमा मुजावर यांना 585 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या रेश्मा शेख यांनी 462 मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकत्र्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

 
Top