उमरगा/प्रतिनिधी-उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली येथील डॉ.प्रियंका वसंत कांबळे यांनी आयुर्वज्ञान विद्यापीठ नाशिक येथून नोव्हेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एम.डी.(भूलतज्ञ) या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश यश संपादन केले आहे
उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील रहिवाशी असलेल्या वसंत कांबळे यांची ती मुलगी आहे. प्रिंयका हिने सोलापूर येथून उच्चमध्यमिक शिक्षण घेतले आहे. वालचंद महाविद्यालय येथून पदवीपर्यंतचे एम.बी.बी.एस.शिक्षण सोलापूर येथील वैशंपायन वैदकीय महाविद्यालय येथे पूर्ण केले आहे.पदयुत्तर शिक्षणासाठी त्या पुणे येथे गेल्या आणि तेथील बी.जे.मेडिकल कॉलेज येथे एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच घेण्यात आलेल्या भुलतज्ञ परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांच्या यशाबद्दल उमरगा तालुका परिसरातुन अभिनंदन केले जात आहे.