कळंब /प्रतिनिधी -
दिनांक 20 डिसेंबर रोजी तेर - औरंगाबाद ही कळंब आगाराची एस टी बस सकाळी 8.30 वाजता कळंब बसस्थानकातून मार्गस्थ झाली, मांजरसुंबा गावाजवळ बस पंमचर झाली. मात्र एस टी मध्ये शिल्लक स्टेपनी नसल्यामुळे एक तास प्रवाश्यांना अन्य बसची वाट पहावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
बस मधील अनेक प्रवाशी औरंगाबादला न्यायालयीन कामासाठी जात होते तर कांहिना बीडला इतर सरकारी कामकाजासाठी जायचे असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. वैतागलेल्या कांहीं प्रवाश्यांनी सदर बस लांब पल्ल्याची असूनसुद्धा बस मध्ये  स्टेपनी, जॉक का ठेवला नाही असा सवाल करताच चालक व वाहक यांची भंबेरी उडाली, एक तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर इतर बसने प्रवासी पुढे मार्गस्थ झाले. एसटीच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध करत कांहीं सजग प्रवाश्यांनी या बस चे फोटो ही सोशल मीडयाद्वारे व्हायरल केले तर एका प्रवाशाने फोन करून आमच्या प्रतिनिधीला याची माहिती दिली.
 
Top