लोहारा/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व तसेच तालुका सरचिटणीसपदी नेताजी शिंदे यांची निवड करण्यात आली.
 लोहारा शहरातील भारत माता मंदिरात निवडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख म्हणुन जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य नितीन  काळे, अँड.अनिल काळे, सुधीर पाटील, अँड. खंडेराव चौरे, लोहारा तालुक्याचे निवडणूक अधिकारी रामदास कोळगे, सरचिटणीस संताजी चालुक्य, सतिश देशमुख, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते, सह निवडणूक अधिकारी किशोर साठे, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे (उमरगा), माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, अदि उपस्थित होते. या तालुकाध्यक्ष पदासाठी एकूण 24 जण इच्छुक होते. या सर्वांशी वरिष्ठ पदाधिकारी यांनी चर्चा करून सर्वानुमते राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प.स.सदस्य वामन डावरे, ज्ञानेश्वर परसे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, दिनकर जावळे पाटील, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, शब्बीर गवंडी, शिवशंकर हत्तरगे, सुरेश वाघ, दादा मुल्ला, सुभाष गिरी, प्रशांत लांडगे, मल्लिनाथ फावडे, विजय महानूर, दगडू तिगाडे, कल्याण ढगे, प्रमोद पोतदार, अनिल ओवंडकर, प्रशांत काळे, अजित ढोणे, बाळु माशाळकर, बालाजी चव्हाण, किशोर होनाजे, नागनाथ लोहार, कमलाकर सिरसाट, गुरुसिंग बायस, किरण मळकंदे, जयेश सुर्यवंशी, किशोर होनाजे, दिलीप पुजारी, योगीराज सोमवंशी, सुधीर पाटील, प्रकाश मडेवार, काशीनाथ घोडके, योगीराज रामशेट्टी, आप्पा गायकवाड, सुरेंद्र काळप्पा, महेश पाटील, लक्ष्मण माने, भास्कर माने, यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयेश सुर्यवंशी यांनी केले तर आभार बालाजी कदम यांनी मानले. 
 
Top