तुळजापूर/प्रतिनिधी-
शहरातील जवाहर नवोदय विद्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात तालुक्यातील ग्राहक चळवळीशी संबंधित असणारे  श्री संपत जळके, वडणे,  प्रकाश धट,  धनाजी कुरुंद यांनी  ग्राहक संरक्षण बाबतीत माहीती दिली.
प्रारंभी प्रास्तविक  श्री संदीप जाधव निरीक्षण अधिकारी तहसील तुळजापूर यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व विद्याथ्र्यांंना व नागरिकांना मान्यवरांनी ग्राहकांचे हक्कबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बीएसएनएल ऑफिस, पुरवठा विभाग, गॅस एजन्सी,  वैधमापन शास्त्र विभाग इत्यादी विभागांचे स्टॉल लाऊन उपस्थितींताना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रमास तालुक्यातील रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री जाधव व सचिव श्री शेटे यांनी प्रात्यक्षिक दाखवून विद्याथ्र्यांना पॉस मशीन समजावून सांगितली. कार्यक्रमात ग्राहक दिननिमित्त विद्यार्थी करिता आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयातील प्राचार्य श्री इंगळे , संदीप, जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री शेटे यांनी केले. यावेळी श्री पवार पेशकार, श्री वाघमारे कोतवाल श्री सिडमले, श्री मिसाळ, यांनी परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
 
Top