तेर/प्रतिनिधी-
पुरातन सांस्कृतीचा वारसा लाभलेल्या व महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध तेरची पाहणी करण्यासाठी येथे आमदार राणजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही सहभाग नोंदवला.
हेरिटेज वॉकचा शुभारंभ जिल्हा परिषद केंद्रीय शाळेजवळील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून करण्यात आला. कै. रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तूसंग्रहालयापर्यत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत, जिल्हा पर्यटन समितीचे अध्यक्ष युवराज नळे, सदस्य नितीन सस्ते, बाळा गवळी, दिनेश वाघमारे, तेरचे शिवाजीराव नाईकवाडी, रेवणसिध्द लामतुरे, बाळासाहेब वाघ, सरपंच नवनाथ नाईकवाडी, संग्रहालयाचे सहअभिरक्षक अमोल गोटे, अनिल ठोंबरे, दीपक महाराज खरात, गोरख माळी आदिंसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉकला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी इतिहास, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेषांसह पुरातन वास्तूंच्या पाऊल खुणांची ओळख पर्यटकांना करून देण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद शहरात येणारे साहित्यिक भेट देणार असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. नियोजित संग्रहालयाच्या इमारतीच्या पाया खोदकामाचीही आमदार पाटील यांनी पहाणी केली. यावेळी दीपक नाईकवाडी, भारत नाईकवाडी, नवनाथ इंगळे, प्रवीण साळुंके, बालाजी पांढरे, विजयसिंह फंड, प्रवीण व्यास, बापू नाईकवाडी, भूषण भक्ते, प्रभाकर शिंपले, राजेश लाड, पांडुरंग भक्ते, दिपक कोळपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
Top