उमरगा/प्रतिनिधी-
 तालुका वनपरिक्षेत्र कार्यालय व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यशाळेला वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने 50 कोटी वृक्षलागवडीची व्यापक चळवळ हाती घेण्यात आली असून सर्वत्र लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील व्हंताळ येथे शनिवारी घेण्यात आलेल्या वृक्ष संवर्धन यासाठी लोक संवाद कार्यशाळेचे उद्घाटन उस्मानाबाद येथील विभागीय वन अधिकारी ए व्ही बेडके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक वनीकरणाचे वन परिक्षेत्र अधिकारी युवराज बिराजदार, वनपरिमंडल अधिका री दयानंद निलंगेकर, वनरक्षक टी ए डिगोळे, काका मगर, बी व्ही सुर्यवंशी, सरपंच राजाभाऊ पाटील, उपसरपंच व्यकंट जाधव, संदीपान पाटील, शालीनी जगताप, सुमन जाधव, गोविंदराव मोहिते, दत्तात्रय मोहिते,तानाजी मोहिते, तुळशीराम गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी विभागीय वन अधिकारी ए व्ही बेडके यांनी वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व स्पष्ट केले. झाडे हेच आपले मित्र आहेत, जीवनाच्या प्रारंभा पासून अखेर पर्यंत झाडांमुळेच आपल्याला प्राण वायू मिळतो. पर्यावरणाचा कायम समतोल ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकांनी पोटच्या लेकरांप्रमाणे वृक्ष व झाडांचे संगोपन करावे असे आवाहन केले. टी. ए. डिगोळे, युवराज बिराजदार यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. संवाद कार्यशाळेत शासनाच्या विविध योजना बांबू समृद्धी योजना, स्वयंपाकासाठी गॅस वापराचे महत्व, अट्टल वृक्ष लागवड यासह विविध विषयावर तज्ञानी मार्गदर्शन केले. विठ्ठल जाधव, व्ही. व्ही.भुरे, चंद्रकांत सास्तूरे, सायबण्णा मेकाले, मारूती एंप्पाळे, सुनिल मेकाले, रोहित गुरव, शिवाजी जगताप यांनी वृक्ष संवर्धन संवाद कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अट्टल बाबूं योजनेचा शेतक-यानी मोठया संख्येनी लाभ घेण्याचे आवाहन संवाद कार्यशाळेत करण्यात आले.
 
Top