तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतील छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळयाच्या जागेचा वाद निकाली निघाल्याने आता शिवप्रेमींना छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर सुशोभिकरणाचे वेध लागले आहेत.  श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे जागतिक दर्जाचे  विलोभनीय  सुशोभिकरण करण्याची मागणी शिवप्रेमींन मधुन व्यक्त केली जात आहे.
श्री तुळजाभवानी व छञपती शिवाजी महाराज यांचा वापर निवडणूक पुर्वी सर्वच पक्ष करीत आले आहेत. आता तर राज्याची सत्ता शिवसेना - कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या  महाविकास आघाडीकडे आहे. आणी तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  करीत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे प्रतिनिधीत्व येथे असल्याने जागतिक दर्जाचा सुशोभिकरण करण्यास कुणाचाही विरोध असणार नाही. महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनार्थ येणा-या भाविकास छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर पाहुन अतिआनंद होईल असे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे व हे करताना त्यात शिवकालीन इतिहासाचा  खुणा सुशोभिकरणात दिसणे गरजेचे आहे .या कार्यास  केंद्र - राज्य सरकार ने अर्थिक मदत करणे गरजेचे आहे तरच हे सुशोभिकरणाचे कार्य जागतिक दर्जाचे होणार आहे, असी मांगणी होत आहे.
 
Top