उमरगा/प्रतिनिधी-
युवासेनेचे नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त 21 डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे (शिवनेरी चषक) आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.21) माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या हस्ते स्पर्धचे उद्घाटन झाले.
किरण गायकवाड यांचा सात जानेवारीला वाढदिवस आहे, त्या निमित्ताने शिवनेरी चषक स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम येणा-या संघास दोन लाखाचे पारितोषक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषक एक लाखाचे असून मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान पटकाविणाऱ्यास पंचवीस हजार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज, सर्वोत्कृष्ठ गोलंदाज व सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकास प्रत्येकी दहा हजाराचे पारितोषक देण्यात येणार आहे.
शनिवारी या स्पर्धचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, बाजार समितीचे सभापती एम.ए. सुलतान, नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अडँ अभयराजे चालुक्य, अॅड. प्रवीण तोतला,  पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले, शिवनेरी चषकचे संयोयक किरण गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुका प्रमुख मोहन पनुरे, माजी नगराध्यक्ष अब्दुल रज्जाक अत्तार, धनंजय मुसांडे, बसवराज वरनाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. विनोद देवरकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, संतराम मुरजांनी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत मोरे, डॉ. डी. एस. थिटे, जिल्हा परिषद सदस्य शेखर घंटे, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सिद्रामप्पा दुलंगे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, प्रा. डॉ. संजय अस्वले, सागर शिंदे, सौ. मीनाक्षी दुबे, योगेश तपसाळे, मुरूमचे माजी नगरसेवक राजशेखर मुदकण्णा, शरद पवार, संदीप चौगुले, प्रदिप मदने, रोहीत पवार, पंच काका जाधव, भास्कर शिंदे आदींची या वेळी उपस्थिती होती. "
धावपळीच्या युगात तरूणांनी आरोग्य सदृढ ठेवण्याची गरज आहे. मोबाईल, फेसबूकच्या सोशल मिडीयात तरूण गुरफटला जातोय, त्यांनी हातातील मोबाईलचा सकारात्मक वापर करायला हवा. विविध क्रिडा स्पर्धत सहभागी होण्यासाठी मैदानावर आले पाहिजे असे मत माजी खासदार प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केले.
या वेळी श्री. शिंदे, श्री. मोरे, अॅड. चालूक्य यांनी क्रिकेटप्रेमीनी स्पर्धचा आनंद सकारात्मक दृष्टीने घेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.  युवा नेते श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संगमेश्वर भडोळे यांनी सूत्रसंचलन केले.
स्पर्धच्या यशस्वितेसाठी संयोजक सागर शिंदे, बापूराव गायकवाड, योगेश तपसाळे, मुजीब इनामदार, ज्ञानेश्वर सांगवे, साईनाथ विभूते, बालाजी जाधव, गोपाळ जाधव,ओम जगताप, हैदर शेख, विराट माळी आदींनी पुढाकार घेतला.
 
Top