अस्थिरोग व दंतरोगाची तपासणी व मार्गदर्शन
गावडे क्लिनिकचे 22 व्या वर्षात पदार्पण
 उस्मानाबाद/ प्रतिनिधी- तालुक्यातील बेंबळी येथील डॉ. अविनाश हरिश्चंद्र गावडे यांच्या गावडे क्लिनिकच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवार, 5 जानेवारी रोजी क्लिनिकमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
बेंबळी व परिसरातील विविध गावांतील रूग्णांना मागील 21 वर्षांपासून आरोग्य सेवा देणारे डॉ. अविनाश गावडे यांनी आजवर लाखो रूग्णांच्या आजारावर उपचार करून त्यांना दिलासा दिला आहे. गावडे परिवारातील डॉ. अविनाश गावडे यांच्यासह होमिओपॅथीतज्ञ डॉ. अमोल गावडे यांनी केशेगाव येथे, त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना अमोल गावडे यांनीही रूग्णसेवेचा वसा बेंबळी व परिसरात सुरू ठेवला असून आरोग्य सेवेला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गावडे क्लिनिकच्यावतीने आयोजित शिबिरात अस्थिरोग व दंतरोग तपासणी व मार्गदर्शन लातूर येथील गोबाडे हॉस्पीटलचे अस्थिरोगतज्ञ डॉ. सचिन डी. गोबाडे, दंतरोगतज्ञ डॉ. सुकन्या सचिन गोबाडे, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमोल गावडे, डॉ. अविनाश गावडे व अर्चना गावडे या तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरासाठी इच्छूकांनी गावडे क्लिनिक येथे 50 रूपये शुल्क भरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
या आजाराची होणार तपासणी
या शिबिरात गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, फ्रॅक्चरवरील उपचार, ठिसूळ हाडावरील उपचार, हिरड्या, दातांची किड काढून चांदी बसवणे, कवळी बसवणे, रूट कॅनल ट्रीटमेंट, तुटलेल्या दातांवर उपचार, लहान मुलांच्या दातांचे उपचार आदी आजाराची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावडे क्लिनिकच्यावतीने करण्यात आले आहे. 
 
Top