उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत सोमवारी (दि.16) बैठक पार पडली.
 यावेळी जिल्ह्यातील शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पीकविमा, अतीवृष्टीमुळे झालेले नुकसान याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, आंदोलनादरम्यान दाखल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे वापस घ्यावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 यावेळी नवीन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा झाली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र इंगळे यांची फेरनिवड करण्यात आली. तर जिल्हाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष अमोल हिप्परगे तसेच राज्याचे प्रवक्ते, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. 
 
Top