लोहारा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील औराद येथील रहिवाशी असलेले डॉ. सुरज राजेंद्र सुर्यवंशी यांची रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, एडीनबर्ग (इंग्लंड यु.के) च्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे. डॉ. सुरज राजेंद्र सुर्यवंशी यांचे ओर्थोपेडीक सर्जरी मध्ये (अस्थीरोग तज्ञ) पदव्युत्तर शिक्षण पुणे इथे पूर्ण झाले आहे.
सध्या ते फोर्टीस हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई इथे अस्थीरोग तज्ञ म्हणुन कार्यरत आहेत. डॉ. सुर्यवंशी यांनी सांधारोपण या शस्त्रक्रिये मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी स्पेशलायजेशन पुर्ण केले असून नुकतेच त्यांची रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, एडीनबर्ग (इंग्लंड यु.के.) चे मेंबर म्हणुन निवड झाली असून पुढे इंग्लंड मध्ये जाऊन ओर्थोपेडीक आणि सांधारोपण शस्त्रक्रियेमधील जॉईंट रिप्लेसमेंट मधील आधुनिक पद्धतीच्या ऑपरेशनचा अनुभव त्यांना मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग आपल्याकडील गरजू पेशंट ना भविष्यात होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व सत्कार होत असून डॉ. सुरज सुर्यवंशी हे लोहारा ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र उत्तमराव सूर्यवंशी यांचे सुपुत्र आहेत.

 
Top