तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवात सिंहासन पुजेची संख्या वाढविण्याची मागणी श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाने श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे.
श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञोत्सव पुजारी वृंदाचा उत्सव असुन यात स्थानिक पुजारी वृंद सिंहासन पुजा मोठ्या प्रमाणात करतात. सध्या शाकंभरी नवराञोत्सवात प्रतिदिन सकाळी पाच, संध्याकाळी दोन सिंहासन अशा सात सिंहासान पुजा केल्या जातात तर सकाळी केल्या जाणा-या सिंहासन पुजेची संख्या पाच ऐवजी दहा करावी व पुजारी संख््यानुसार सिंहासन पुजेची संख्या पुजारी मंडळांना द्यावी या प्रकरणी तात्काळ विश्वस्तांची बैठक घेवुन यात वाढीव सिंहासन पुजेचा निर्णय घ्यावा अशी मागणी चे निवेदन पुजारी मंडळाचे उपाध्यक्षविपीन शिंदे यांनी दिले आहे. याची प्रती श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष तथा तहसिलदार विश्वस्त उपविभागीय अधिकारी तहसिलदार, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष बापुसाहेब कणे यांना देण्यात आल्या आहेत.