उमरगा/प्रतिनिधी-
वंश परंपरेने येणा-या दमा आजारापेक्षा श्वसानामुळे,एलर्जी,शीतपेये, प्रदूषण व ताणतणाव अशा कारणाने दमारुग्णांच्या संख्येत विलक्षण वााढ झाली आहे. वाढते वायू प्रदूषण हे अधिक चिंताजनक असून ग्रामिण महिलांचा चूलीवरील स्वयंपाक व डासांच्यासाठी वापरण्यात येणारी क्वाईल ही दमारुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ करण्याचे कारण आहे. जाहिरातीत पाहून झटपट ईलाजाच्या मागे लागून शास्त्रीय कारणांकडे दुर्लक्ष करणे हे धोक्याचे ठरत असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील छातीविकार व दमा तज्ञ डॉ सुहास बर्दापूर यांनी केले. त्यांनी आपल्या 41 वर्षातील 42 हजार रूग्णांच्या तपासणीच्या, शेकडो शिबीराच्या अनुभवारून अत्यंत खुमासदार शैलीत दमा रूग्णांचे प्रबोधनही केले.
 शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट व शिवाई हॉस्पिटल, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दमा मार्गदर्शन  व उपचार शिबीर आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुहास बर्दापुरकर (एम. डी.मेडिसिन व दमा तज्ञ,औरंगाबाद)  व डॉ.विजय बेडदुर्गे (एम. डी.चेस्ट फिजिशियन व अस्थमा तज्ञ,उमरगा) यांना रुग्णांची तपासणी केली. दमा व त्यासंबंधी चे सर्व आजार याबाबत गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले व उपचारा संबधी माहिती दिली. दमा या रोगाची कारणे,लक्षणे व उपचार पद्धती यासंबंधी ही मार्गदर्शन करण्यात आले. जास्त चालल्यावर श्वास गुदमरणे, वारंवार खोकला येणे, सतत सर्दीचा त्रास होणे, श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे, बेडके पडणे, विविध वासांची अलर्जी असणे, कारखान्यातील धुरामुळे व तेथील कामामुळे होणारा दमा,  छातीत तुला त्रास असेल, हाड वाढणे, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी, थुंकी वाटे रक्त जाणे इत्यादी सारख्या आजारांची तपासणी व उपचार केले या शिबिरामध्ये 170 रुग्णांनी मोफत तपासणी व उपचार लाभ घेतला.
या शिबिरामध्ये शिवाई चॅरिटेबल ट्रस्टस कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी मधील औषधनिर्माणशास्त्र पदविका च्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. यावेळी शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष बी एच बेडदुर्गे, डॉ अभिजित पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य महेश कदारे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रा अजय बेडदुर्गे यांनी कोरेगाव, बेडगा, गुंजोटी,औराद,मुळज,नंदगूर,मिरगाळी,चिवरी, मंठाळ,तलमोड,तुरोरी, कासार शिर्शी, निलंगा, कळंब, मन्नाखिळी, बिदर आदी गावातून रुग्णांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांचे  आभार मानले.
 
Top