उस्मानाबाद// प्रतिनिधी -
भारतीय जनता पार्टी भूम तालुकाध्यक्ष म्हणून महादेव वडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज भूम येथे झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य नितीन काळे, भूम तालुक्याचे निवडणूक अधिकारी संताजी चालुक्य, सरचिटणीस जालिंदर मोहिते, सतिश देशमुख, प्रभाकर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष, अँड. नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते, सह निवडणूक अधिकारी राजसिंह पांडे, काकासाहेब चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीसाठी तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांशी वरिष्ठ पदाधिकारी यांनी चर्चा करून सर्वानुमते महादेव वडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्वांनी टाळ्याच्या गजरात अनुमोदन दिले.यावेळी मावळते तालुकाध्यक्ष आदम शेख, संतोष सुपेकर, बालाजी बांगर, भाऊसाहेब कुटे व तालुक्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top