उमरगा/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उमरगा येथे होत असलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलन अध्यक्षपदी दहावीची विद्यार्थीनी निकिता बालाजी पाटील तर संमेलन स्वागताध्यक्ष पदी मुख्याध्यापक धनराज तेलंग यांची बुधवारी (दि 25) निवड करण्यात आली.
येत्या सहा जानेवारीला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाहि एक दिवसीय विद्यार्थी साहित्यसंमेलन शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत संपन्न होणार असून बुधवारी निवड समितीने संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विद्याथ्र्यांची निवड चाचणी घेण्यात आली. वाचन केलेले साहित्य व पुस्तकाबद्दल स्वत:चे मत नोंदवणे, साहित्यासंदर्भ विषयक प्रश्नाची उत्तरे देणे,उत्स्फुर्त काव्यलेखन अन स्वत: लिहिलेले साहित्य सादर करणे असे निकष या निवड चाचणीचे स्वरूप होते. या निवड चाचणीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून शहरातील श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता बालाजी पाटील सरस ठरल्याने अध्यक्षपदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.विद्यार्थी साहित्य संमेलनाच्य स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक धनराज तेलंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गटशिक्षण कार्यालय, अभिजात साहित्य मंडळ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
 
Top