उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2020 च्या नूतन अध्यक्षांची नुकतीच निवड झाली. त्यानंतर महोत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारिणीची अध्यक्ष योगेश सोन्ने-पाटील यांनी घोषणा केली आहे.
यामध्ये कार्याध्यक्षपदी जयंत देशमुख, सचिव- विकास माळी, संघटक-सूरज मुळे, कोषाध्यक्ष गजानन खर्चे-पाटील, विधी सल्लागार अॅड. राघवेंद्र बोधले, उपाध्यक्ष आकाश तावडे, वैभव मोरे, सौरभ उंबरे, सूरज शेरकर, ऋषिकेश चपने, सहकार्याध्यक्ष अॅड. अविनाश जाधव, सागर पडवळ, सहसचिव गणेश ढेकणे, विशाल पाटील, सहसंघटक मयुर शेरकर, सौरभ गायकवाड, सहकोषाध्यक्ष सतीश लोंढे, रुद्र भुत्तेकर, प्रसिद्धीप्रमुख अशोक सोन्ने-पाटील, सह प्रसिद्धीप्रमुख सचिन कदम, सोशल मीडिया प्रमुख सुजित जमदाडे, प्रवक्ते विशाल सूर्यवंशी आदींची निवड झाली. नूतन कार्यकारिणीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, भारत कोकाटे, जयंत पाटील, दत्तात्रेय बंडगर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.

 
Top