परंडा / प्रतिनिधी -
परंडा तालुक्यातील अनाळा येथील तरुण अब्दुल याशीन पठाण याचे ह्रदयविकाराने निधन झाले होते.त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची  असल्याने त्यांच्या कुटुंबाला जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने किराणा सामान व मुलींना कपडे व पत्नीला साडी भेट देण्यात आली.
दि.14 रोजी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ सावंत, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे व प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते अब्दुल पठाण यांच्या पत्नीला किराणा सामान व कुटुंबाला कपडे अशी एकुण 6000 हजार रुपयाची मदत करण्यात आली. यावेळी साजीद शेख, बाबासाहेब सुरवसे, विकास सरवदे, अजित शिंदे, एन.डी. क्षिरसागर, अझहर शेख, महंमद शेख, विक्रम जाधव आदी उपस्थित होते.
 
Top