तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दि.22 रोजी झालेल्या  माजी विद्यार्थी मेळावात एकमेकांशी संवाद साधुन नंतर पन्नास माजी विद्याथ्र्यांनी रक्तदान करुन  मोठ्या उत्साहात माजी विद्याथ्र्यां मेळावा संपन्न झाला .
यावेळी  260 माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी  मेळाव्याचे उद्घाटन  विद्यालयाचे प्राचार्य श्री. के .वाय .इंगळे व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी माजी विद्याथ्र्यानी स्मृतीला उजाळा देण्यासाठी नवोदयची सामूहिक प्रार्थनेचे गायन करण्यात आले .नंतर माजी विद्याथ्र्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे , गुरु शिष्य संवाद असे वेगवेगळे कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी माजी विद्याथ्र्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा फेटे बाधुन व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. यावेळी अनेक माजी विद्याथ्र्यांनी  विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या  रक्तदान शिबिरात  पन्नास माजी विद्याथ्र्यांनी रक्तदान केले. यानंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 
Top