उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तुळजापूरच्या शुभम जगताप याने अंतिम विजेता किताब पटकावला. या स्पर्धेत 32 स्पर्धक सहभागी झाले होते. शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रक्रीडा संकुलावर रविवारी (दि.29) सायंकाळी ही स्पर्धा घेण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  धाराशिव श्री या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे सदस्य महेश लोंढे, प्रशांत वीर, शिवलिंग गुळवे, राहुल बचाटे यांनी यासाठी पुढाकार घेतला. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. चुरशीच्या स्पर्धेत तुळजापूरच्या शुभम जगताप याने अंतिम विजेता किताब पटकावला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सतीश पाटील, विक्रम पाटील, शिवलिंग गुळवे, अमित शिंदे, रोहित निंबाळकर, डॉ.श्रीकांत मिनियार, निलेश भोसले, सतीश क्षीरसागर, गणेश पोतदार यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सारंग जोशी व राहुल बचाटे यांनी केले. स्पर्धेत ए.के.सिद्दिकी, शकील बडेघर,शफी शेतसंदी, श्री कुंभार यांनी पंच म्हणून काम पाहिले.

 
Top