तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील यशवंतराव चव्हाण  महाविद्यालयात बहि: शाल शिक्षण मंडळ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद  आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने   सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार विषयक मार्गदशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन दि.28 डिसेंबर  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.कैलास पाथ्रीकर यांच्या हस्ते झाले.
 यावेळी  बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास  बोरगावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा चे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, सिनेट सदस्य प्रो. डॉ.गोविंद काळे, प्राचार्य डॉ. एम. जी. बाबरे, उपप्राचार्य एन. बी.जाधव, शिबिराचे संयोजक प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रो. डॉ. अशोक मरडे ,प्रा. डॉ. अनिल शित्रे, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा. डॉ. देशमुख, प्रा. रामलिंग थोरात , महादेव जाधव, संतोष वाळके, शुभम माने, अनिकेत कदम, माऊली माने, शिवकन्या म्हेत्रे, आरती शिंदे, तृप्ती लसणे,बबिता मूळे आदींची उपस्थिती होती.

 
Top