तुळजापूर/प्रतिनिधी-
आपल्या समाजात अज्ञानातुन अंधश्रद्धा निर्माण होत आहे, कारण सुशिक्षित समाजातही पर्यावरणविषयक अज्ञान मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे.आपणच निसर्गातील जीव सृष्टिचे रक्षण करणे गरजेचे आहे. साप शेतक-यांचा मिञ त्याची हत्या करु नका, असे प्रातिपदन प्रा.निखिल अडसुळे यांनी केले.
तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा वतीने आयोजित तिर्थ खुर्द येथे सुरु असुन शिबिराच्या चतुर्थ दिवसीय प्रबोधन कार्यक्रमात पर्यावरण संवर्धना करीता सर्प जनजागृती अभियान या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना प्रा.निखिल अडसुळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,  अज्ञानामुळे आज अनेक लोक शेतक-यांचा मित्र असलेला साप मारुन टाकत आहे, कारण एक उंदीर एका महिन्यात कमीत-कमी 12 पिलांना जन्म देते.धामण जातिच्या सापाला उंदीर जास्त आवडतात.पण शेतकरी अज्ञानापोटी सापाला मारतात.निसर्गातुन पक्षी नामशेष झाले तर लोक भूकबळीने मारले गेल्याचे उदाहरण चिनमध्ये इतिहासात दिसुन येते. विश्वात एकुण 3500 सापाच्या जाती आढळतात त्यापैकी एकुण 27 जाती आपल्याकडे आढळतात, मण्यार, घोणस,नाग हे विषारी आहेत, त्यांना कसे ओळखायचे याबद्दलची माहिती त्यांनी यावेळी दिली.साप माणसाचा शत्रु नाही माणूस सापाचा शत्रु आहे.आपण सर्वांनी मिळून सापांचे सरंक्षण केले तरच पर्यावरण संवर्धन साधले जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 
Top