भूम प्रतिनिधी-
तालुक्यातील वंजारवाडी येथील अशोक भीमराव डोंबाळे (50) यांचा अनैतिक संबधाच्या कारणावरून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खड्ड्यात टाकून दगडाने झाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना शनिवार (दि.30) ते रविवार (दि.1) दरम्यान घडली असून याप्रकरणी तिघा संशयितांवर भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
वंजारवाडी येथील अशोक भीमराव डोंबाळे हे शनिवारी (दि.30) सकाळपासून गायब होते. रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. रविवारी सकाळीही नातलगांनी शोधाशोध केली. दरम्यान, भूम ते बार्शी जाणाऱ्या रोडजवळ मोतीमाळ परिसरात एका ठिकाणी जमिनीवर रक्ताचे डाग दिसले. त्यावरून एका खोदलेल्या मातीनाल्यात अशोक डोंबाळे हे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर वार केल्याच्या जखमा होत्या. भूमचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, एपीआय मंगेश सावळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनीही भेट दिली. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अशोक डोंबाळे यांचा मुलगा लहु डोंबाळे याने भूम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने वडीलांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे नमूद करून याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अर्जून चंद्रभान डोंबाळे, ऋषीकांत अर्जून डोंबाळे (रा. वंजारवाडी) व दत्ता बाबा चोरमले (रा. कोरेगाव ता. बार्शी) यांच्यावर संशय व्यक्त केला. तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला असून तपास सपोनि मंगेश साळवे हे करत आहेत.