उस्मानाबाद/प्रतिनिधी-
दि.30 सप्टेंबर 1993..च्या पहाटे नियतीने जे घडविले, निसर्गाचे रौद्र रुप ज्यांनी कुणी पाहिले,अनुभवले, त्यांच्या उरात खोलवर रूतलेल्या जखमा, किंकाळ्या, टाहो ऐकून बधीर झालेली संवेदना व त्या दु:खाचा आजही जाणवणारा तेवढाच दाह, धग, आक्रोश......म्हणजे राजेंद्र भंडारी या कवी मनाच्या लेखकाने संवेदनशील अंतकरणाने लिहिलेले पुस्तक "भय इथले संपत नाही". भयाण वास्तवाला,करूणेला मायेचा स्पर्श करून वेदना काळजाला भिडवून रसिकांसमोर समर्थपणे सादर केलीय. चित्र आणि शब्दांना ललित बंधात बांधून दिलेला हे दु:ख तळ हलवून सोडणारे हे पुस्तक.
संस्कार भारती उस्मानाबाद शाखेच्या साधकाचे हे अद्वितीय पुस्तक रविवार,दि.8 डिसेंबर रोजी येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जेष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार श्री. भारत गजेंद्रगडकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, कवी गझलकार युवराज बप्पा नळे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार उर्फ भाऊसाहेब भन्साळी या मान्यवरांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यिक कथाकार श्री. माधव गरड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरूवात संस्कार भारतीच्या ध्येय गीताने झाली. यावेळी सर्वच मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तकाचे लेखक राजेंद्र भंडारी यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद करताना आज इतकी वर्ष होऊनही या प्रसंगाची जखम ओली असून त्याच्या दाहकतेतून जाणवलेली तीव्र वेदना म्हणजे हे पुस्तक आहे,असे मत व्यक्त केले. लेखक अत्यंत संवेदनशील हळव्या अंत:करणाचे असल्याने त्यांनी या विषयाचे गांभीर्य व वास्तव अत्यंत हळूवार टिपलेय, आपण त्या दाहक अनुभवाचे साक्षीदार असून अत्यंत जवळून तो आक्रोश मी अनुभवलाय, अशी भावना जेष्ठ पत्रकार तथा या पुस्तकासाठी ज्यांनी त्या काळात पत्रकारिता करीत असताना छायाचित्रण केलेले छायाचित्रकार श्री. भारत गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी यावेळी या पुस्तकाच्या मांडणी व विषयाचा आढावा घेताना त्यांनी स्वत: सन 2001 मध्ये गुजरात राज्यात अनुभवलेला भूकंपाचा दाह कथन केला. या पुस्तकातील काही प्रसंग वाचताना आपणाला गुजरातमधील भुकंपात प्रत्यक्ष अनुभवलेल्या भयंकर दुख:द प्रसंगांची आठवण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
साहित्यिक अंगाने या पुस्तकाचे मूल्यमापन करताना जेष्ठ साहित्यिक माधव गरड यांनी भंडारींच्या सामाजिक भावना जाणीवा किती जिवंत आहेत, हे अधोरेखित केले. साहित्य निर्मिती मागची मूळ प्रेरणा किती प्रगल्भ असू शकते, हे लेखक श्री. भंडारी यांनी प्रयत्नातून दाखवून दिले,असे मत अध्यक्षीय समारोपात श्री. गरड यांनी व्यक्त केले.
अत्यंत नेटके आयोजनाचे सुखद चित्र उपस्थितांना अनुभवायला मिळाले. संस्कार भारतीचे अध्यक्ष शामसुंदर भन्साळी, जिल्हा संघटन मंत्री प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा प्रमुख श्री. शेषनाथ वाघ यांनी या प्रकाशनाच्या संपूर्ण यशासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी कवी श्री. सुधीर कुलकर्णी, कवी गझलकार राजेंद्र अत्रे, कवी डॉ. रुपेशकुमार जावळे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, दिपकजी लिंगे, श्रीमती अर्चनाताई व श्री. रविंद्र अंबुरे, सौ गजेंद्रगडकर, प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संस्कार भारतीचे सचिव सुरेश भाई सुंबेकर, उपाध्यक्ष अनिल ढगे, कोष प्रमुख अरविंद पाटील, नाट्यविद्या प्रमुख धनंजय कुलकर्णी, मुकुंद मेंढेकर, शरद वडगावकर, शहरातील अनेक मान्यवर, साहित्यप्रेमी, नागरिक, कुटुंबीय, श्री. भंडारींचे स्नेही, नातलग, मित्र-परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.